भारतीय जनतापक्षावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करणाऱ्यांविरोधात पक्ष पोलीस बाळाचा वापर करून त्यांचा आवाज शांत करत आहे अश्या अनेक बातम्या गेले काही महिने कानावर येत आहेत. असाच अनुभव काही आर. टी. आय. कार्यकर्ते व पत्रकारांना देखील आला आहे.
भाजपचा महाराष्ट्रातील भ्रष्टाचारा विरोधात लढणारा चेहरा म्हणून ओळखलेजाणारे मुंबईतील खासदार किरीट सोमैया यांनी मागील आठवड्यात मुलुंड मधील आर. टी. आय. कार्यकर्ते- अनिल म्हस्के यांच्या विरोधात वरिष्ठ पोलीस निरिक्षक, केशवकुमार कासार (मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई) यांच्याकडे तक्रार केली आहे.
म्हस्के इंटिरियर डेकोरेशनचा व्यवसाय करतात व त्याच बरोबर ते आर. टी. आय. कार्यकर्ते म्हणून देखील सक्रिय आहेत.
भाजपचे मुलुंड मधील नगरसेवक मनोज कोटक यांच्या बेनामी संपत्ती बाबत मुख्यमंत्री कार्यालय व राज्य निवडणूक आयोगाकडे अनिल म्हस्के यांनी तक्रार केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील अनेक समस्यांवर त्यांचे लक्ष असते व अनेक भ्रष्टाचारांच्या मुद्द्यांवर मत मांडायला ते फेसबुकचा वापर करतात.
“दुसऱ्या पक्षातील लोकांबाबत खासदार सोमैया कायम बोलतात, पण स्वतःच्या पक्षातील बेनामी संपत्ती असलेल्या लोकांविरोधात ते शांत का राहतात?”
“देशातील प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडायचे स्वातंत्र्य संविधानात दिलेले आहे, मग ते मत खासदाराबद्दल असो किंवा मग पंतप्रधानांबद्दल. कोणते ही मत आक्षेपार्ह शब्द न वापरता मांडले तर तो गुन्हा कसा ठरेल? कदाचित हा सोपा मुद्दा भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सर्वोच्च न्यायालयाने समजवून देखील समजला नाही,” असे मत म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.
(खासदारांचे या विषयावर मत जाणून घ्यायला आम्ही त्यांच्या कार्यालयाला फोन करून काही प्रश्न ई-मेल केले आहेत, तथापि, त्यांचे उत्तर आले नाही. त्यांची बाजू त्यांच्याकडून समजताच आम्ही वृत्त लेख अद्यतनित करू.)
This content cannot be used as evidence against the writer and publisher to file case in any court of law around the world. Images used in the content belong to their respective owners. The aim of this site is to spread awareness without any financial gain. We do not wish to defame anyone, hurt anyone’s sentiments or cause financial loss to any individual or organization.
All rights reserved with- CJ24