फेक न्युज पसरविणार्‍या ‘राईट-विंग’ वेबसाइट्सने समाजमाध्यमांचा गैरवापर थांबवावा

सोमवार, १६ जुलै रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने ‘पोस्टकार्ड न्यूज’ वेबसाईटच्या फेसबुक पेज वर ‘फेक न्यूज,’ अर्थात खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे कारवाई केली. पोस्टकार्ड न्यूजचे अधिकृत पेज सरळ डिलीट करण्यात आले आहे. फेसबुकच्या भारतातील प्रतिनिधींनी या कारवाई बाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यास नकार दिला.

फेसबुकने केलेली ही कारवाई फक्त पोस्टकार्ड साठीच नव्हे तर बातम्याच्या नावाखाली अफवा पसरवणाऱ्या इतर वेबसाइट्ससाठी देखील एक इशारा आहे.

गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत,पोस्टकार्ड न्यूज वेबसाईटने अनेकदा बातम्यांच्या नावाखाली दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करणारे मजकूर प्रसिद्ध केले आहेत. ही वेबसाईट बंगळुरू मधील भाजपचे कार्यकर्ते, महेश हेगडे व विवेक शेट्टी यांच्या मालकीची आहे.

पोस्टकार्ड न्यूजच्या माध्यमातून अफवा पसरवून कर्नाटक राज्याच्या निवडणुकांअगोदर हिंदू-मुस्लिम दंगली घडवणे, तसेच स्वतःच्या  ट्विटर अकाउंटचा वापर करून दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे महेश हेगडे यांना काही रात्र तुरुंगात देखील काढावी लागली होती. या वर्षी मार्च महिन्यात हेगडे यांच्यावर आयपीसी कलम १२० बी, २९५ ए, १५३ ए, कलम ३४, आयटी अॅक्ट कलम ६६ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

डाव्या विचारसरणीच्या पत्रकारांचे वर्चस्व कमी करण्याच्या हेतूने सुरु झाले पोस्टकार्ड

यात काहीच शंका नाही की २०१२ पर्यंत सर्व इंग्रजी बातम्यांची माध्यमे डाव्या विचारसरणीच्या पत्रकारांच्या ताब्यात होती. इंग्रजी भाषेत सर्वसमावेशक व संतुलित बातम्या देणारी पोर्टल्स उत्सुक वाचकांसाठी सुरु करायची असे अनेक भाजप समर्थकांनी ठरवले. भाजप शासित राज्याच्या चांगल्या कामांबाबत माहिती पुरवणे हा देखील यांचा एक हेतू होता. यासाठी २०१२ पासूनच अनेक ‘राईट-विंग’ वेबसाइट्स सुरु करण्यात आली. सुरवातीला सर्वानीच अचूक माहिती, तथ्ये लोकांसमोर मांडू असे आश्वासन दिले. परंतु, भाजप २०१४ साली सत्तेत आल्यापासून यातील काही वेबसाइट्सनी आपला खरा रंग दाखवण्यास सुरवात केली.

न्युज चॅनेल्सने पाठ फिरवलेल्या जनहिताच्या विषयांवर किंवा संशोधनात्मक तथ्यावर आधारित लेख प्रसिद्ध करण्या एवजी या राईट-विंग वेबसाइट्स बातम्यांच्या नावाखाली दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करणारे मजकूर सतत प्रकाशित करतात. यां वेबसाइट्स वर भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक शब्द पण लिहिला जात नाही. जे पत्रकार मोदी किंवा भाजप विरोधात बातम्या देतात त्यांच्यावर पोस्टकार्ड सारखे पोर्टल लेख लिहून त्याना ‘देशद्रोही,’ ‘प्रेस्टिट्यूट,’ किंवा ‘काँग्रेस, कम्युनिस्ट समर्थक,’ घोषित करून टाकतात.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सामान्य माणसाच्या आयुष्यात काही फारसा चांगला बदल झालेला नाही. पण राईट-विंग वेबसाइट्स वरील लेख वाचून असे वाटते की भारताचे जणू चार वर्षात मोदी ने अमेरिकेत रूपांतर केले आहे. देशात काही चांगले झाले की त्या मागे मोदी आणि वाईट झाले की काँग्रेस. भारतात एखादा रेल्वे अपघात झाला की त्या मागे पाकिस्तानी दहशतवादी आहेत असे लेख लगेच पोस्टकार्ड सारख्या या पोर्टल्स वर येतात. काही लेख वाचून अक्षरशः हसू येते. यांच्या लेखकांना अमृता फडणवीसच्या मुंबई रिव्हर अँथम व्हीडिओमध्ये नाचणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शारुख खान सारखे वाटतात.

वाचक मूर्ख नाहीत

वेबसाईट रँकिंग किंवा संकेतस्थळावर येणाऱ्या वाचकांची संख्या तपासण्यासाठी अनेक साधने आहेत. साधारण २०१३ पासून २०१८ पर्यंतची सर्वच राईट-विंग पोर्टल्सचे आकडे असे सांगतात की यांच्या वाचकांची संख्या दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने घटत आहे.

भाजपच्या दारात

पोस्टकार्डला भाजपशी जोडणारे अनेक पुरावे आहेत. शेट्टी तसेच हेगडे यांनी स्वतः आपण भाजप, संघाशी जोडलेले आहोत असे अनेकदा कबूल केले आहे. दोघांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनेक भाजपचे मंत्री ट्विटरवर फॉलो करतात. मार्च महिन्यात हेगडे यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केल्यावर त्यांच्या मदतीला कर्नाटक भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस तेजस्वी सूर्या खुद्द वकील म्हणून हजर होते.

या वर्षी ३ जुलै रोजी रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने मॉब लिंचिंग प्रकरणांमुळे ‘व्हॉट्सअॅपला’ फेक न्यूजबाबत कडक भूमिका घेण्याचा इशारा दिला होता. मेसेजिंग अँप च्या डेव्हलपर्स ने ‘फेक न्युज फॉर्वर्डेड मेसेजेस’ थांबवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. व्हॉट्सअॅप देखील फेसबुकच्या मालकीचे आहे. फेसबुकने नुकतेच ‘बूम- फैक्ट चेकिंग नेटवर्क’ या भारतीय कंपनी बरोबर करार केला आहे. दोघांनी मिळून फेसबुकवर फेक न्यूज, अफवा पसरवणाऱ्या पेजीसवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे.  पोस्टकार्ड न्यूज वेबसाईटच्या फेसबुक पेज वर केलेली कारवाई हा त्याचा एक भाग आहे असे म्हटले जाते.

यामुळे, क्लिक-बेट, फेक न्यूज, किंवा दंगा भडकावण्याच्या हेतूने लिहिलेले लेख फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवून त्याना मूर्ख बनवण्याचे दिवस आता मोजकेच उरले आहेत याची हेगडे सारख्या लोकांनी नोंद घ्यावी.

लेखक: नित्तेंन गोखले (पत्रकार)

लेख आवडल्यास आपली प्रतिक्रिया नक्की द्या —- nittengokhaley24@gmail.com

हा लेख प्रथम साप्ताहिक ‘चपराक’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.

Chaprak Weekly, July 30 to August 5 edition


Nitten is a consultant journalist, and has worked with renowned newspapers, news agency in India. If you are looking for desktop journalist, writer, you can email Nitten- nittengokhaley24@gmail.com

The article is for personal viewing only.  This content cannot be used as evidence against the writer and publisher to file case in any court of law around the world. Images used in the content belong to their respective owners. The aim of this site is to spread awareness without any financial gain. We do not wish to hurt anyone’s sentiments or cause financial loss to any individual or organization.

All rights reserved with- CJ24

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.