यश मिळवण्यासाठी जगात कोणताही शॉर्टकट नाही. ध्येय निश्चित करून प्रचंड मेहनत घेतल्यास माणसाची भरभराट नक्कीच होते. परंतु यासाठी सकारात्मक मानसिकता निर्माण होणे गरजेचे असते. यात मदत मिळावी याकरिता लोक विशिष्ट कपडे, वस्तूंचा रंग, खास आकड्यांची संख्या असलेली बँक खाती, वाहन क्रमांक, घर क्रमांक, इत्यादी निवडतात. याच यादीत सध्या भर झाली आहे ती म्हणजे लकी मोबाइल नंबरची.

संख्याशास्त्र हे तार्किकदृष्ट्या समजावून सांगता येईल असे विज्ञान आहे. एकेकाळी न्युमरोलॉजीकडे अंधश्रद्धा म्हणून पाहिले जात होते. पण बॉलिवूड, क्रिकेटर्स आणि राजकारण्यांनी योग्य रित्या अंकशास्त्राचा वापर करून दाखविल्याने लोकांचे मत बदलले. सध्या यश मिळवण्यासाठी काही राजकारणी लोक आणि चित्रपट अभिनेते स्वतःच्या नावात देखील थोडाफार बदल केल्याचे सहज दिसून येते. चित्रपटाच्या रिलीजची तारीख, शपथविधी सोहळ्याची तारीख संख्याशास्त्राप्रमाणे निवडली जाते.

न्युमरोलॉजी प्रमाणे जन्माच्या तारखेस अनुकूल असलेला मोबाइल नंबर

एकेकाळी, भ्रमणध्वनी संचाचा वापर फक्त कॉल आणि एसएमएस पाठवण्यासाठीच केला जायचा. परंतु सध्या ५-जी नेटवर्कच्या काळात मोबाइलचा वापर पीडीएफ, वर्ड फाइल स्वरूपात कागदपत्रे वाचण्यासाठी, टीव्ही चॅनेल्स पाहण्यासाठी, डिजिटल वॉलेट वापरण्याकरिता, व प्रवासी सहाय्यक म्हणून वापर केला जातो. व्यक्ती घरी असो, ऑफिसमध्ये, किंवा प्रवासात असो, भ्रमणध्वनी संच कायमच खिशात राहतो. अगदी श्राद्धात सुद्धा मोठमोठ्या आवाजात मोबाइलवर बोलणारे, किंवा व्हाट्सअँप मेसेज चेक करणारे लोक आढळतात.

आर्थिक व्यहार/व्यवसाय संबंधित सूचना, तसेच वैयक्तिक दृष्ट्या चांगल्या व वाईट बातम्या फोनवरूनच मिळतात. थोडक्यात, मोबाइल शरीराचा एक अतिरिक्त अवयव असल्यासारखा असून आपल्या जीवनातील अनेक पैलू त्याच्याशी जोडले गेलेले आहेत. या भ्रमणध्वनी संचाची ओळख असते त्याच्या सिम-कार्ड, अर्थात, मोबाइल नंबर मध्ये.

मोबाइल नंबर व्यक्तीच्या व्हिजिटिंग कार्ड वर असतो. त्याचा वापर बँक व्यवहारात, तसेच व्यवसाय दस्तऐवज, व्यवसायीक ईमेल, वैयक्तिक कागदपत्रात देखील केला जातो. वाहन नोंदणी क्रमांक, घर क्रमांक आणि बँक खाते क्रमांकाइतकाच मोबाइलफोन नंबर महत्वाचा असतो. वाहन नोंदणी दरम्यान आपल्या पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी लोक प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन आवश्यक ते अतिरिक्त शुल्क भरतात. नवीन घर घेताना नंबर ‘लकी’ आहे का याचा विचार केला जातो. त्याचप्रमाणे सध्या संख्याशास्त्रात विश्वास ठेवणारे लोक न्युमरोलॉजीचा वापर करून ‘लकी’ मोबाइल नंबर निवडतात.

देशातील नामवंत संख्याशास्त्रज्ञांच्या यादीतील एक महत्वाचे नाव, गौतम आजाद, यांनी न्युमरोलॉजी प्रमाणे मोबाइल नंबर कसा निवडावा याबाबत मत मांडले

हा क्रमांक मोबाइल वापरणाऱ्यांच्या आयुष्याशी थेट जुडलेला असतो आणि त्याचा जीवनावर चांगला किंवा वाईट प्रभाव पडतो. मोबाइल नंबर व्यक्तीच्या व्यावसायिक जीवनात यश मिळवण्यास हातभार लावतो, व आयुष्यात स्थिरता आणू शकतो.

कंट्री कोड वगळता मोबाईल नंबरच्या १० आकड्यांची बेरीज करून मिळणारा अंक हा महत्वाचा ठरतो. उदाहरणार्थ, क्रमांक जर ८०८७६१४४२३ असा असेल तर त्याची बेरीज  ८+०+८+७+६+१+४+४+२+३ = ४३ (४+३=७).

क्रमांक ४ आणि ८ जास्त प्रमाणात असलेले मोबाइल नंबर लोकांनी वापरू नयेत कारण दोन्ही अत्यंत आक्रमक आकडे मानले जातात. तसेच, मोबाइल नंबरच्या एकूण आकड्यांची बेरीज ४ किंवा ८ होणारे नंबर्स देखील वापरणे टाळावे. उदाहरणार्थ, ९+३+०+७+९+१+६+४+९+५ = ५३ (५+३= ८).

महत्वाचा मुद्दा म्हणजे, एकूण आकड्यांची बेरीज ६ (२४, ४२, ३३, ६०) असलेले मोबाइल नंबर सर्वांनाच चांगले ठरूशकतात.

  • जन्म तारीख १, १०, १९, किंवा २८ असलेल्या व्यक्तीसाठी ३७, ४६, ६४, ७३ एकूण बेरीज असलेले मोबाईल नंबर योग्य ठरू शकतात. हेच भ्रमणध्वनी क्रमांक २, ११, २०, व २९ तारखेचा जन्म असलेल्यांना देखील फायदेशीर.
  • कुणत्याही महिन्याच्या ३, १२, २१, व ३० तारखेला जन्म झालेल्यांसाठी ३ किंवा ६ अंतिम बेरीज होणारे (२१, २४, ३३, ४२, ५७, ६०) मोबाईल नंबर्स लकी ठरूशकतील.
  • जन्म ३, १२, २१, ३० तारखेचा असल्यास एकूण बेरीज ३ किंवा ६ (२१, २४, ३३, ४२, ५७, ६०) असलेले नंबर निवडल्यास उत्तम.
  • त्याचप्रमाणे ४, १३, २२, ३१ या तारखेला जन्मलेले लोकांसाठी ४ किंवा १ अंतिम संख्या असलेले (१९, ३७, ४६, ६४, ७३) भ्रमणध्वनी क्रमांक योग्य ठरल्याचे अनुभव आहेत.
  • महिन्याच्या ५, १४, २३ ला जन्म झालेल्यांनी २३, ३२, ३३, ४१, ४२, ५०, ६० अंतिम बेरीज होणारे नंबर निवडावेत.
  • जन्म ६, १५, २४ तारखेचा असेल तर १५, २४, ३३, ४२, व ६० अंतिम संख्या होणारे नंबर निवडावेत.
  • वाढदिवस ७, १६, २५ तारखेला असल्यास १. १९, ३७, ४६, ६४ बेरीज होणारे नंबर योग्य ठरू शकतील.
  • सर्वात जास्त पर्याय मिळतात ते मात्र ८, १७, २६ तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींना. त्यांच्यासाठी १५, १९, २१, २३, २४, ३२, ३३, ३७, ४१, ४२, ४६, ४८, ५०, ६०, ६४, ७३ बेरीज असलेले मोबाईल नंबर्स लकी ठरण्याची शक्यता असते.
  • जन्म ९, १८, २७ चा असल्यास शेवटची बेरीज २१, २४, २७, ३३, ४२, ४५, ६० होणारे नंबर निवडल्यास फायदा होऊ शकेल.

आपल्या जन्माच्या तारखेस अनुकूल असलेला मोबाइल नंबर शोधणे सर्वात कठीण भाग ठरतो. मोबाइल कंपन्यांच्या निवडक अधिकृत स्टोअरशिवाय, काही सिम कार्ड विक्रेते ग्राहकांना लकी, किंवा फॅन्सी मोबाइल नंबर निवडून देतात. आवडत्या संख्येचा पोस्टपेड नंबर सहज मिळू शकतो, परंतु, अशा प्रीपेड सिम विक्रेत्यांची संख्या खूपच कमी आहे.

लेखक: नित्तेंन गोखले

Special thanks to, Astro-Numerologist Gautham Azad

You can get in touch with him on : 9845422809

This article was originally published by Pune’s PRABHAT Daily, on September 15, 2019.

Prabhat’s Rupagandh supplement, September 15,2019.

Link for e-paper version


The article is for personal viewing only.  This content cannot be used as evidence against the writer and publisher to file case in any court of law around the world. Images used in the content belong to their respective owners. The aim of this site is to spread awareness without any financial gain. We do not wish to hurt anyone’s sentiments or cause financial loss to any individual or organization.

All rights reserved with- CJ24

One response to “अंकशास्त्रानुसार मोबाइल नंबर?”

  1. Vinayak.D Avatar

    Nice info

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.